Posts

CCE: An overview

  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन - एक दृष्टीक्षेप                मित्रांनो, ज्ञानाचे स्वरूप हे एकवर्णी नाही. व हे ज्ञान मिळविण्याचा मार्गही केवळ एक आणि एकच नाही. ज्ञान हे विविधांगी आहे. ते प्राप्त करण्याचे मार्गही भिन्न आहेत. काही ज्ञान हे गंधरूप असते, काही स्पर्शातून मिळते, काही श्रवणातून मिळते, काही दृश्य स्वरुपात आहे, काही रस स्वरुपात आहे. ज्या स्वरूपातील ज्ञान आहे, त्यानुसार पंचज्ञानेन्द्रीयांपैकी योग्य इंद्रियामार्फत ते प्राप्त होत असते.                आकलनामध्ये प्रत्येकाची रुची, गती, पद्धती हे महत्वाचे घटक भूमिका बजावत असतात. ज्या प्रमाणे ज्ञानाच्या स्वरूपामध्ये भिन्नता आढळून येते, त्याप्रमाणेच ज्ञानप्राप्तीमध्ये व्यक्तीभिन्नता आढळून येते. ईश्वराची प्रत्येक निर्मिती ही एकमेव अद्वितीय आहे. काहींना केवळ ऐकून समजते. काहींना पाहिल्यानंतर चांगले समजते. काहींना चित्रपटांच्या माध्यमातून आकलन होते. तर काहींना प्रत्यक्ष अनुभवातून चांगले समजते. विविधांगी ज्ञानप्राप्तीसाठी विविध मार्गांचा अवलंब करण...

Use of ICT: The need of the hour

  माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची कास धरणे: काळाची गरज                आज तंत्रज्ञानाचा विकास, प्रचार व प्रसार झपाट्याने होत आहे. हे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये तर कल्पनातीत प्रगती झाली आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व त्याचे साधन असलेल्या संगणकाने तर आज मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला आहे. मग शिक्षण क्षेत्र तरी या प्रभावापासून कसे दूर राहू शकेल. आज तंत्रज्ञान आपल्या नखाच्या टोकावर येऊन पोहोचले आहे. या तंत्र-ज्ञानापासून आजचा विद्यार्थी तरी कसा दूर राहू शकेल. उलटपक्षी आजचा विद्यार्थीवर्ग हा तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ आलेला आहे. तंत्रज्ञानाच्या वापराबाबतीत तरी आजचा विद्यार्थी हा शिक्षकाला मागे टाकून पुढे गेल्याचे अनुभवास येत आहे. आजच्या विद्यार्थ्यांसमोर व्हर्च्युअल लर्नींग, संगणक, आंतरजाल यांसारखे अधिक प्रभावी पर्याय व विविध ज्ञानस्रोत सहज उपलब्ध आहेत व ते त्याच्या आवाक्यामध्ये आहेत. ज्ञानाचे विस्तीर्ण दालन भ्रमणध्वनीसारख्या सर्वत्र उपलब्ध व सहज वापरता येण्याजोग्या माध्यमातून आजच्या व...

Teaching English to beginners: A talk

  हितगुज: इंग्रजी भाषेचे अध्यापन                इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडील पालकांचा ओढा व वाढते आकर्षण लक्षात घेऊन डिसेंबर १९९९ च्या शेवटास महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. तो होता ‘इयत्ता पहिलीपासून हसत खेळत इंग्रजी शिकण्याचा’. जून २००० पासून बिगर-इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये ह्या महत्त्वाकांक्षी निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली. अभ्यासक्रमाची व पाठ्यसाहित्याची रचनाच अशा पद्धतीने करण्यात आली की, मातृभाषा शिकता शिकता तिच्या मदतीने इंग्रजी भाषेचे अध्ययन व्हावे. ह्यासाठी भाषिक खेळ, बडबडगीते, गोष्टी, छोटे-छोटे संवाद यांची मदत घेतली जाते. इयत्ता पहिली व दुसरीमध्ये श्रवण व भाषण सराव तसेच वाचन व लेखन पूर्वतयारी असे इंग्रजी अध्ययनाचे स्वरूप आहे.              अध्यापन देखील अगदी अनौपचारिक पद्धतीने करणे अपेक्षित आहे. मातृभाषेचा वापर करून मुलांशी सुसंवाद साधणे (establish rapport) व भाषिक कृतींच्या माध्यमातून भाषा आत्मसात करण्याच्या संधी व वातावरण तयार करणे एवढे साधे-सोपे स्वरूप...

Teachers Day - A Reflection

 A Reflection on the Teachers Day...                                                             गुरु: ब्रह्मा, गुरु: विष्णू, गुरु: देवो महेश्वर: ।                                                             गुरु: साक्षात् परब्रह्म:, तस्मै श्री गुरवे नम: ।। Dear friends, Greetings of the Day!             To begin with, I would like to remember and express my gratitude to all those teachers who enabled me to interact with you all. Our nation has experienced a rich tradition of Guru (a teacher) & Shishya (a disciple) for ages since the ancient time. In the passage of time, the nature o...

Reflection on 'Teachers Day'

  शिक्षक दिनाच्या निमित्ताने .  . . गुरु: ब्रह्मा, गुरु: विष्णू, गुरु: देवो महेश्वर: । गुरु: साक्षात् परब्रह्म:, तस्मै श्री गुरवे नम: ।। नमस्कार मित्रांनो,                आपणासोबत संवाद साधण्यासाठी सक्षम बनविणाऱ्या सर्व गुरूंना वंदन करून आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधत आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासूनच गुरु-शिष्याची एक समृद्ध परंपरा चालत आली आहे. काळपरत्वे गुरुचे स्वरूप बदलत गेले. अध्यापन पद्धती बदलत गेल्या. पूर्वी गुरु शिष्याचे नाते अगदी घनिष्ठ (गुरुगृहीच शिष्याचा वास असल्यामुळे) होते. ज्ञानाचे संक्रमण हे मौखिक पद्धतीने गुरुकडून शिष्याकडे होत असे. पाठांतर व शास्त्रार्थावर भर असायचा. अगदी प्राचीन काळी सर्व ज्ञान-विज्ञान हे वेदांमध्ये एकवटले होते. श्लोकांच्या स्वरूपातील हे अगाध ज्ञान गुरूंकडून शिष्यांकडे मौखिक पद्धतीने संक्रमित होत असे. त्यामुळे ज्ञानार्जनासाठी गुरुशिवाय पर्याय नव्हता. गुरु हा ज्ञानार्जनाचा एकमेव स्रोत होता. संस्कृत भाषा व वर्ण व्यवस्था यांमुळे ज्ञान, विज्ञान व शिक्षणाचे सार्वत्र...

Vocabulary Building

Teaching Vocabulary to Young Learners: Part-1 Teaching the First Words  Hello friends! Welcome back after a break of a week. Hope you have read my first blog post ( https://ujjwalkarawande.blogspot.com/2020/04/first-blog.html ) published on 27 th April 2020. Those who missed it can hit the link above and visit my first blog post. Thanks for an overwhelming response to my first blog post. It shows your enthusiasm and zeal to learn new things. Many of you congratulated and boosted my confidence to share with you some ELT practices. Some of you expected me to reflect on the ELT practices. I’m eager to know about your ELT practices. Please post your innovative ELT practices through your comments to every blog post. This week, I’m going to bring to you some ELT practices related to teaching vocabulary to young learners that are experimented over the globe. ‘Teaching Vocabulary to Young Learners’ is a vast horizon. This week I’m going to reflect on some internation...